राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी

1 min read

मुंबई दि.८:- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले. मुंबई शहरामध्ये क्रॉस मैदान येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. यावेळी सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमार, गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या ड्रिलमध्ये पोलीस, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, गृह रक्षक दल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक जिल्हा प्रशासन, एनएसएस, एनसीसी यांनी सहभाग घेतला. तसेच अणुशक्ती नगर येथे ब्लॅक आऊट मॉक ड्रिल झाले.

त्याचप्रमाणे राज्यात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही मॉक ड्रिल घेण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे