ज्ञानमंदिर महाविद्यालय आळेचा निकाल ९६.८१ टक्के;संस्थेच्या वतीने विद्यार्थांचा सत्कार

1 min read

आळेफाटा दि.७:- ज्ञानमंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६.८१टक्के लागल्याची माहिती प्राचार्य संदीप भवारी व उपप्राचार्य सुरेश कु-हाडे यांनी दिली. ज्ञानमंदिर आळे कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल ८८.०९ टक्के लागला असून प्रथम कु.जाधव अंतरा संदीप ८४.३३ टक्के, द्वितीय भांगरे साक्षी अनिल ८४.०० टक्के, तृतीय केदारी रोहिणी बारकू ८१.०० टक्के गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच वाणिज्य मराठी शाखेचा निकाल ९६.१५ टक्के लागला असून प्रथम पटेल पूर्वा रमेश ८६.८३ टक्के गुण, द्वितीय वर्मा पुनम रामजी ८१.५० टक्के गुण, तृतीय भारती सानिका ज्ञानेश्वर ७९.०० टक्के गुण मिळाले आहे तर इंग्रजी वाणिज्य शाखेचा निकाल ९७.७० टक्के लागला आहे. प्रथम गाडगे समृद्धी भाऊ ९२.३३ टक्के गुण, द्वितीय द्वितीय बोरचटे स्नेहा संदीप ९१.०० टक्के गुण, तृतीय भंडारी सेजल सुनिल ८९.०० टक्के गुण मिळाले आहे विज्ञान शाखेचा निकाल ९९.०५ टक्के लागला आहे. प्रथम डावखर दर्शन प्रकाश ८९.६७ टक्के गुण, द्वितीय पिंगळे सुमेध शरद ८७.५० टक्के गुण, तृतीय वाजे क्षितिजा गणेश ८७.१७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गाडगे समृद्धी, वाजे क्षितिजा, जाधव अंतरा, पटेल पूर्वा या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. तसेच माजी अध्यक्ष किशोर कुऱ्हाडे, पंचायत समिती सदस्य व विद्यमान संचालक मा. जीवन शिंदे, विद्यमान संचालक मा. प्रदीप गुंजाळ आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी सर्व पदाधिकाऱ्यांनी मा.अजय नाना कुऱ्हाडे अध्यक्ष, मा.सौरभ भाऊ डोके उपाध्यक्ष, मा.अर्जुन पाडेकर सचिव मा. अरुण हुलवळे खजिनदार, मा.किशोर कुऱ्हाडे माजी अध्यक्ष, मा.भाऊ कुऱ्हाडे माजी अध्यक्ष,मा. उल्हास सहाणे माजी उपाध्यक्ष,मा.बबन सहाणे रावजी माजी उपाध्यक्ष,मा. बाबुराव कुऱ्हाडे, मा.शिवाजी गुंजाळ, मा.जीवन शिंदे – सदस्य पंचायत समिती जुन्नर, मा.दिनेश सहाणे उपसरपंच कोळवाडी, मा.कैलास शेळके, मा.प्रदीप गुंजाळ, मा.देविदास पाडेकर, मा.सम्राट कुऱ्हाडे,मा. रमेश कुऱ्हाडे,मा. शांताराम कुऱ्हाडे, प्राचार्य मा. संदीप भवारी ,मा. कोते सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य मा.सुरेश कु-हाडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता कुऱ्हाडे यांनी केले. आभार प्रदर्शन मा.अमोल कापसे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे