तळ्याई देवीचा यात्रोत्सव मोठया उत्साहात संपन्न

1 min read

बेल्हे दि.६:- बेल्हे (ता जुन्नर) येथील शिवारातील देवकर मळा येथील तळ्याई देवीचा यात्रोत्सव मोठया उत्साहात पार पडला. यावेळी सकाळी भटजी विजय देशपांडे यांच्या हस्ते देवीचा अभिषेक आणि चोळी पातळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुचाकी चारचाकी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मांडव डहाळ्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावाकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहिले होते तसेच महिला वर्ग आपल्या डोक्यावर कलशपात्र घेऊन पारंपारिक फुगड्या खेळत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक पार पडल्यानंतर तळ्याई मित्र मंडळाने भाविकांसाठी अल्पआहाराची सोय केली. दुपारच्या वेळी महिलांनी फुगड्या संगीत खुर्ची अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्या स्पर्धकास तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी चार ते पाच या वेळेत शेरनी वाटप करण्यात आला. त्यानंतर शैनेश्वर प्रासादिक मंडळ यांच्या वतीने प्रवचन हरिपाठ करण्यात आला.रात्री सात ते नऊ या वेळेत युवा कीर्तनकार ह. भ. प. अक्षय महाराज उगले जेऊर हैबती (ता. नेवासा) यांची सुरेख कीर्तनसेवा झाली.कीर्तनसेवेनंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाची सोय मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमावेळी तळ्याई मित्र मंडळाचे कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, विशाल देवकर, जालिंदर देवकर, गणेश देवकर, सुभाष देवकर, कारभारी देवकर, रंगनाथ देवकर, पोपट देवकर, सोपान देवकर, निलेश देवकर, संभाजी देवकर, ज्ञानेश्वर देवकर, गंगाराम गुंजाळ, नामदेव आग्रे, संतोष आग्रे, केशव काळे मित्र मंडळ, खंडू जाधव मित्र मंडळ, बाळासाहेब जाधव मित्र मंडळ, अशोक मधे मित्र मंडळ, बबन काळे मित्र मंडळ तसेच ग्रामस्थांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी नियोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे