‘सूर्या ॲकडमी’ च्या २५० विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड:- श्रीकांत मदने
1 min read
आळेफाटा दि.९:- आळेफाटा येथील ‘सुर्या करिअर ॲकडमी’ मधील यावर्षी २५० पेक्षा जास्त विद्यांर्थ्यांची पोलिस दलात निवड झाली असल्याची माहिती संचालक श्रीकांत मदने यांनी दिली.आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सुर्या करिअर ॲकडमी मध्ये सन २०२३- २४ च्या पोलीस भरतीत जवळपास २५० हुन अधिक जणांची जणांची निवड झालेली असुन यामध्ये विशेष करून १३ जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ग्रामीण भागातील व विशेष करून शेतकरी कुटुंबातील अतीशय गरीब परीस्थिती व गरजु मुलांसाठी सन २००० सालापासुन आळेफाटा या ठिकाणी अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीकांत मदने, योगेश टकले,
अतुल लामखडे, आदेश हाडवळे,रवी पाटील, विशाल गावडे,बाबा जाधव, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. इयत्ता १२ वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता पोलीस, सैनिकी क्षेत्रात तसेच इतर सरळसेवा भरती मध्ये उत्तम करिअर घडवण्याची संधी सुर्या करिअर ॲकडमी ने उपलब्ध करून दिली असुन
अतीशय गरीब कुटुंबातील हे सर्व जण असुन या सर्वांना या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षात तीन हजारांपेक्षा जास्त पोलिस, बाराशे पेक्षा जास्त सैनिक, चौदा पी.एस.आय, चार एस.टी.आय, तेरा पेक्षा जास्त तलाठी व इतर सरळसेवा भरतीमध्ये दोनशेहून अधिक जण भरती झालेले आहे.अशी माहिती सुर्या करिअर ॲकडमीचे संचालक श्रीकांत मदने यांनी दिली.