‘महापर्यटन उत्सव महाबळेश्वर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

1 min read

महाबळेश्वर दि.३:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभागातर्फे दि. २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित ‘महापर्यटन उत्सव महाबळेश्वर’चे उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व मान्यवर उपस्थित होते. महाबळेश्वर येथील पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेशा या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, त्यांना सुरक्षीत वातवरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करुन या उपक्रमाबद्दल देसाई यांचे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.पर्यटन तथा पालकमंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याचे ब्रॅन्डींग जगभरात करण्यासाठी या महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोसत्वाच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. नटलेले, सुशोभित झालेले महाबळेश्वर पहायला मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे. सर्वांनी मिळून हा महोत्सव यशस्वी करुया, पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी पर्यटन सुरक्षा दल निर्माण केले असून प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर येथे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन येत्या काळात पर्यटन सुरक्षा दल उपक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे