शिर्डी साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; मंदिराची सुरक्षा अलर्टवर

शिर्डी दि.४ – साईभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. साई संस्थानच्या ईमेल अॅड्रेसवर मेल पाठवून साईबाबा मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.धमकीचा मेल दक्षिण भारतातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साई संस्थानकडून आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सरकारला संपर्क करणे सुरू आहे. साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सतर्कता म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साई मंदिराची सुरक्षा व्यवस्था देखील अलर्टवर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे