पिंपरी पेंढार यात्रेत दागिने चोरी करणारे तिघे जेरबंद
1 min read
ओतूर दि.४:- जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २४ एप्रिल २०२५ रोजी पिंपरी पेंढार येथील मुक्तादेवी यात्रेत दागिने चोरणार्या दोन महिलांसह एका पुरुषाला नागरिकांनी पकडून ओतूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तिनही आरोपींनीकडून चोरलेले १ लाख ६० हजारांचे दीड तोळ्यांचे मंगळसूत्र व कार (एमएच २० एजी ९२०६) असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सुरेश गौतम चव्हाणसह दोन महिला (तिघे रा. इमामपूर, ता. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.