बिबट्याच्या हल्ल्यात ३ शेळ्या व ३ मेंढ्या ठार
1 min read
ओतूर दि.४ :- जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वाघचौरे मळा येथे राहणारे विकास मारुती वाकचौरे यांच्या गोठ्यामध्ये शिरुन बिबट्याने ३ शेळ्या व ३ मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याची घटना शनिवारी (दि. ३) पहाटे अडीच वाजता घडली.या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक बेले, किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मृत पशुधनाचा पंचनामा केला.
घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात आला. तसेच बिबट प्रवण क्षेत्रात बिबट वन्य प्राण्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्वरित वन विभागाला कळविण्यात यावे, असे आवाहन ठोकळ यांनी केले आहे.