कुलस्वामी खंडेराय यात्रा उत्सव निमित्त ५ व ६ मे रोजी भव्य बैलगाडा शर्यती
1 min read
पिंपळगाव तर्फे नारायणगाव दि.३:- येथील श्री कुलस्वामी खंडेराया यात्रा उत्सवानिमित्त ५ व ६ मे २०२५ रोजी बैलगाडा शर्यतीचा आयोजन करण्यात आले आहे.प्रथम क्रमांक देणाऱ्या बैलगाड्यात 51 हजार रुपयाची बक्षीस मिळणार आहे तर द्वितीय क्रमांक देणाऱ्या बैलगाड्यास एकतीस हजार रुपये दिले जाणार आहे तृतीय क्रमांक 21 हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.तसेच फायनल गाड्यांमध्ये ज्याचं प्रथम क्रमांक येईल त्या गाड्याला देखील आकर्षक भरती ठेवण्यात आले आहे यामध्ये दुचाकी तीन वाहने बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत तसेच फ्रिज,टेबल फॅन,बॅटरी पंप आकर्षक बक्षीसे देखील दिले जाणार आहेत. सुसज्ज घाट बनवण्यात आला आहे.
घाट बनवण्याचे नियोजन गाडा मालक माजी अध्यक्ष तंटामुक्ती रंगनाथ गुळवे, माजी सरपंच सोपान खांडगे, अथर्व इलेक्ट्रॉनिक्स संजय वऱ्हाडी, एकनाथ वाणी दत्तात्रेय पांडुरंग वाणी, अक्षय खांडगे, अंकुश गुळवे, महेश चव्हाण, सुरज वऱ्हाडी यांनी केले आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील व नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे
असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.कुलस्वामी बैलगाडा यात्रेमध्ये २७५ बैलगाडा मालकांनी टोकन नोंदवले आहेत.अशी माहिती प्रमोद खांडगे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका व यात्रा कमिटी अध्यक्ष,माजी सरपंच पंकज वऱ्हाडी यांनी दिली आहे.