श्रीराम विद्यालयाचा समर्थराजे कर्मवीर विद्या प्रबोधिनी परीक्षेत प्रथम
1 min read
पिंपळगाव खडकी दि.२:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात संपूर्ण रयत शिक्षण संस्थेत श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकीचा समर्थराजे विजय बाणखेले प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.कर्मवीर विद्या प्रबोधिनीमार्फत दरवर्षी ‘कर्मवीर विद्या प्रबोधिनी स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा’ ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये श्रीराम विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणारा समर्थराजे विजय बाणखेले प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य फापाळे डी.पी. यांनी सांगितले.
सदर विद्यार्थ्याला विभाग प्रमुख सासवडे नितीन, राजगुरू सुमती, आचार्य अर्चना, पोखरकर जयकुमार बांगर बबन यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन व विकास समिती तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.