मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘चलो मुंबई’ आंदोलन; २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार
1 min read
मुंबई दि.२:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (३० एप्रिल) रोजी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची हाक दिली असून सरकारविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यावेळी ते पुन्हा एकदा मुंबईत येणार असून २९ ऑगस्ट पासून मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी राज्य सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून २८ तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २९ तारखेपासून उपोषण करू. तसेच यावेळी एकतर विजयाचा रथ आणू किंवा अंत्ययात्रेचा, असा निर्धारही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.