पंतप्रधान मोदींची लष्कराला खुली सूट; पाकिस्तान घाबरलं; जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले
1 min read
नवीदिल्ली दि.३०:- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी स्वत:च त्यांच्या चौक्यांवरील झेंडा खाली उतरवल्याचीही माहिती आहे. LOC सीमारेषेवरील 20 चेक पोस्टवर जोरदार चकमक झाल्याची माहिती आहे, पाकिस्तानकडून हा गोळीबार होत असून भारतीय सैन्य दलही आत घुसून जशास तसे प्रत्त्युतर देत आहे.सीमारेषेवरील नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामूला आणि कुपवाड़ या सीमारेषेला लगत असलेल्या प्रदेशात ही चकमक सुरू आहे.
भारताकडून लवकच हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य आणि राज्यकर्त्यांनीही गतीमान हालचाली सुरू केल्या आहेत. भारताकडून कोणत्याही क्षणी एअर स्ट्राईक होऊ शकतो, त्यामुळे पाकिस्तानने इस्लामाबाद आणि लाहोरसाठी 2 मे पर्यंत नोटम म्हणजे नो टू एअरमॅन जारी केले आहे.
त्यानुसार, आता हे दोन्ही राज्य नो फ्लाय झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे, या प्रदेशातून कुठलीही हवाई वाहतूक होणार नाही, कुठलेही विमान व हेलिकॉप्टर उड्डाण करणार नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने गंभीरतेने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यातच, भाग म्हणून 5 मोठे निर्णय भारत सरकारने घेतले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन किंवा सीमारेषेपलिकडून होणाऱ्या घुसकोरीवर भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच, भारताने बॉर्डवरील आजच्या प्रत्युत्तराने स्पष्ट संदेश दिला आहे. तर, सीमारेषेवरील प्रत्येक हालचालीवर तिन्ही सैन्य दलाचे व राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान पाकिस्तानने सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या काही चौक्या रिकामा केल्या आहेत. या चौक्यावर तैनात असलेले जवान निघून गेले असून, त्या चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आलेत. ज्याचा अर्थ माघार घेतल्याचे संकेत असल्याचे मानले जातंय.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये चार महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील.