देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

1 min read

मुंबई दि.३०:- विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९४ च्या बॅचचे अधिकारी असलेले भारती यांनी यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई पोलिस दलात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. देवेन भारती यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे भारती यांची ही नियुक्ती शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वीचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर ही नियुक्ती झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे