नववधूचा चुडा पाहून गोळी झाडली; डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं
1 min read
श्रीनगर दि.२३:- जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत ते मन सुन्न करणारे आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात एका नववधूने आपल्या नवऱ्याला गमावलं आहे. हे जोडपं लग्नानंतर फिरायला आले होते. पण, दहशतवाद्यांनी तिच्या समोरच तिच्या पतीला गोळ्या घातल्या. यानंतर या जोडप्याचा काळीज चिरणारा एक फोटो समोर आला.
ज्यामध्ये हाती लाल रंगाचा चुडा असलेली नवविवाहिता आपल्या पतीच्या निपचित पडलेल्या देहाच्या बाजुला बसली आहे. तिच्या हातातील लाल चुडा पाहिला, तिच्या पतीने मुस्लिम नसल्यासं सांगितलं आणि दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या झाडल्या.हे दहशतवादी पोलिसांच्या वेषात आले होते.
त्यामुळे त्यांच्यावर कोणाला संशय आला नाही. य दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांना लक्ष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी या पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारला. मुस्लिम नसल्याचं सांगितल्याने त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही काहीतरी म्हणाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.
या पर्यटकांमध्ये एक तरुणी अशी होती जी आपल्या पतीसोबत लग्नानंतर फिरायला आली होती. या नवविवाहित जोडप्याने कधी विचारही केला नसेल की त्यांचं हनिमून त्यांच्यासाठी काळरात्र ठरेल. दहशतवाद्यांनी आधी या तरुणीच्या पतीला त्याचा धर्म विचारला, त्याने मुस्लिम नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी पतीवर गोळ्या झाडल्या, असं रडत रडत ही तरुणी सांगत आहे.
आपल्या पतीला कोणीतरी वाचवा अशी याचना ती करत होती, मात्र तिचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. सारी आस गमावल्यानंतर ही तरुणी खिन्न मनाने आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसली. हे पाहून उपस्थित साऱ्यांच्यांच काळजात धस्स झालं. मिळालेल्या माहितीनुसार, याच तरुणीने पीसीआरला फोन केला होता.
तिने फोन करुन सांगितंल की पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. धर्म विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हातातील लाल चुडा पाहिला, मग धर्म विचारला आणि मग तिच्या पतीला गोळ्या घातल्या, असं तिने म्हटलं आहे.