काश्मीर दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू; इतर दोन पर्यटक जखमी

1 min read

मुंबई दि.२३:- जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असं या मृत पर्यटकांची नावे आहेत. तर दोन पर्यटक जखमी असून एकजण पनवेलचे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जमखी आहेत. जखमींमध्ये माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. तर एस भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे. जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून. त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले.‌ दहशतवाद्यांनी नावे या पर्यटकांना नावे विचारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्य करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे