मोठी बातमी! तळेगाव ते चाकण एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय:- डॉ.अमोल कोल्हे
1 min read
पुणे दि.२२:- तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज दि.२२ रोजी घेण्यात आला.
2019 साली आमदार कोल्हे खासदार झाल्यापासून या एलिव्हेटेड मार्गाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करत होते. या मार्गासंदर्भात संसदेत आवाज उठवताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्राद्वारे अनेकदा पाठपुरावा केला.
महाविकास आघाडी सरकार ते महायुती सरकार मधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांकडे सातत्याने ही मागणी लावून धरली होती.
त्यातच निविदा प्रक्रिया सुरू असताना अचानक हा रस्ता MSIDC कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे पुन्हा एकदा या कामाला खीळ बसली.
ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या या पाठपुराव्याला यश आले याचा मला आनंद आहे. असे मत खासदार कोल्हे यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया
“आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल राज्य सरकारचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार! या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, हीच विनम्र अपेक्षा! नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड मार्ग सुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, याचेही काम लवकर सुरु करावे, हीच राज्य व केंद्र सरकारकडे नम्र विनंती!”
डॉ.अमोल कोल्हे, खासदार शिरूर लोकसभा