चोरट्यांना देवाचीही भीतीच उरली नाही; अर्धा किलो चांदीचा मुखवटा चोरीला

भोर दि.२२: – चोरट्यांकडून घर, दुकाने फोडून चोऱ्या केल्याचे प्रकार होत आहेत. सध्या चोरट्यांना देवाचीही भीती उरली नसल्याने देवळांकडे मोर्चा वळवला आहे. विसगाव खोऱ्यातील नेरे (ता. भोर) येथील ग्रामदैवत बालसिद्धनाथाचा अर्धा किलो चांदीचा मुखवटा रविवारी (दि. २०) रात्री चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.मागील दोन वर्षांपूर्वी परराज्यातील चोरट्यांनी आंबाडे (ता. भोर) येथील जानूबाई देवी मंदिरात पाच किलो चांदीचे मुखवटे व काही सोन्याची दागिने चोरून नेले होते.पोलिसांनी याचा कसून तपास करत काही दिवसांतच चोरट्याला शोधून काढला व त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मेरे (ता. भोर) येथील गाव देवाच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले आहे. रविवारी (दि. २०) रात्री बारा वाजेपर्यंत देवाचा मुखवटा देवळातील घाबऱ्यात होता. सकाळी मंदिर साफसफाई करण्यास, तसेच देवाची पूजा करण्यास काही नागरिक गेले असता. देवाचा चांदीचा ४० ते ५० हजार रुपयांचा मुखवटा गाभाऱ्यातून चोरीला गेल्याचे लक्षात आले. तत्काळ नेरे (ता. भोर) येथील स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे