मोठी बातमी! श्याम्पियन कंपनीच्या अवैध कंपाऊंडवर जुन्नर वनविभागाची कारवाई
1 min read
Oplus_131072
जुन्नर दि.१२:- येडगाव येथील श्याम्पियन कंपनी यांनी 2018 साली फॉ. क.नं- 42 मधील राखीव वनक्षेत्रात अवैध्य तार कंपाऊंड केल्याने वन गुन्हा क्र. ओ 02/ 2018-19
नोंदविला मौजे येडगाव (ता.जुन्नर) फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 42 नोंदविलेल्या गुन्ह्या संबंधी सदर राखीव
वनक्षेत्रात जाऊन साधारण 1 हेक्टर मध्ये जवळ जवळ 250- 300 मीटर लांबीचे अवैध तार कंपाऊंड आज शनिवार दि.१२ रोजी JCB च्या साहाय्याने निष्कासित केले. ही सर्व कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता राजहंस तसेच ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ,
गावचे उपसरपंच अजय नेहरकर, माजी सरपंच हर्षल गावडे, वनपाल संतोष साळुंके, वनरक्षक विशाल गुंड, वनरक्षक महेश जगधने, वनसेवक बाळू वामन व रेस्क्यू मेंबर रोशन भोर, संतोष कुतळ, सोमनाथ भालेराव उपस्थित होते.