चास येथे भव्य सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिर संपन्न

1 min read

अकोले दि.१२:- अकोले तालुक्यातील चास येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवता कळंबादेवी व ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने भैरवनाथ आधार प्रतिष्ठान व शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल,

आळेफाटा तसेच अर्पण ब्लड बँक, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुरेखा रामदास शेळके ,उपसरपंच सचिन मारुती शेळके, सोसायटीचे चेअरमन प्रकाश तुकाराम गोडसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवव्याख्याते बाळासाहेब धोंडू शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात डॉ. शिवाजी खेमनर (एम एस जनरल सर्जन) यांनी 125 नागरिकांवर मोफत उपचार केले. या शिबिरात मूळव्याध, मूत्रविकार, अपघात विभाग, पोट विकार, अपेंडिक्स , हर्निया अशा विविध आजाराचे निदान व औषधोपचार करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षापासून एक लाखापेक्षा जास्त ऑपरेशन केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे परिसरातील अनेक रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी बोलताना डॉक्टर म्हणाले बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण व्यायाम आहाराचे योग्य नियोजन केले तरच उत्तम आरोग्य राखू शकतो तसेच रक्तदान शिबीरास तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अर्पण ब्लड बॅकेचे संचालक गणेश झोडगे यांनी समाधान व्यक्त केले.प्रास्ताविकात सुनील शेळके यांनी भैरवनाथ आधार प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती देऊन आरोग्यशिबीराचे महत्व सांगितले.सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या नंदा खैरे,बचतगट अध्यक्षा निषीगंधा गिरी, सुरेखा गोडे, वृषाली लोहकरे, मंदा शेळके व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी भैरवनाथ आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ पवार, उपाध्यक्ष संदिप जाधव,राहुल देशमुख, नितीन शेळके, प्रविण शेळके, राजेश दुरगुडे, रामदास शेळके, तुषार शेळके, विजय शेळके, किरण वाकळे व तुकाराम शेळके तसेच आधार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दुरगुडे यांनी केले.आभार शिवा भागवत यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे