केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला किल्ले रायगडावर

1 min read

रायगड दि.१२:- देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन करणार आहे. रायगडला जाण्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे शाह हे मुक्कामाला आहेत. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री 11 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले. रात्री त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह देखील भेटल्याची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन कोकणात वातावरण तापलं असून तिढा पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे या पालकमंत्री पदासंदर्भातदेखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात असताना. अमित शाहांचा आजच्या रायगड दौऱ्यानिमित्य या तिढा सुटणार का आणि कोणाच्या पारड्यात रायगडचं पालकमंत्रिपद मिळतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच, गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्य महायुतीत काहीशी चलबिचल होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते रायगडचं पालकमंत्रिपद.त्या अनुषंगाने गाठीभेटी होतानाही दिसत आहे. दरम्यान आज (शनिवारी) अमित शाह रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या दरम्यानच होत असलेल्या या गाठी-भेटीमुळे, जेवण आणि चर्चा यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून, डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे