एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!प्रताप सरनाईक म्हणाले…..  

1 min read

मुंबई दि.११:- प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच 44 टक्के उर्वरित पगाराची रक्कम देण्यासाठी ताबडतोब 120 कोटी रुपये राज्य सरकार एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांनी आज वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली असून, 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी हा एक महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ज्या 1076 कोटींची मागणी एसटी महामंडळाने केली होती, त्यापैकी 120 कोटी आता देण्यात येणार आहेत. तर उर्वरित रक्कम तीन टप्प्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून मिळणार असल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

हे तीन महत्त्वाचे निर्णय आता झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाला सांगितले. दरम्यान, सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

नुकतेच राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात केवळ 56 टक्के पगार देणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी याला कडाडून विरोध दर्शविला आहे. नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला जातो. मात्र, एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% झालेला आहे.

निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालेला आहे. एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरकारकडे उपस्थित करत आहेत.

तसेच सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. जर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेनं घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे