देशभरात यंदा मुसळधार ? मान्सून महाराष्ट्रासाठी अनुकूल; स्कायमेटचा अंदाज काय सांगतो ?
1 min read
पुणे दि.१०:- राज्यात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विदर्भ, मराठवाडा भागात तापमान खूप वाढलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील कोसळत आहे. दरम्यान लवकरच राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कसे असेल, राज्यात देशात किती पाऊस पडेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.याबाबत स्कायमेटचा एक अहवाल समोर आला आहे.स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीने असणार आहे. हळू-हळूच तो पुढे सरकेल असे म्हटले जात आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटचा रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. देशभरात देखील पावसाचे प्रमाण चांगले राहणार असून, 100 ते 103 टक्के पाऊस देशात होणीची शक्यता आहे. देशातील मान्सून सामान्य राहणार आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत 895 मीमी पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा देशात सामान्य राहण्याचा अंदाज हा 40 टक्के राहू शकते. 10 टक्के अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश,
आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.