अभ्यासात सातत्य व मेहनतीच्या जोरावर सपना वाघ हीची कार्यकारी सहाय्यक अधिकारी पदी निवड
1 min read
बेल्हे दि.१०:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील सपना शशिकांत वाघ हिने BMC (बृहन्मुंबई महानगरपालिका) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिची सहायक कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. सपनाने कृषी क्षेत्रात पदवी घेतली असून. अभ्यासात असणाऱ्या सातत्य व मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच बुधवार दि.९ रोजी लागला असून येत्या दोन महिन्यात नियुक्ती आदेश येवून ती रुजू होणार आहे.
सपना ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या या यशात आई वडील कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी ह्यांचा मोठा वाटा असल्याचे देखील तिने सांगितले.सपना चे यश पाहून बेल्हे ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे.