सीएनजी, पीएनजी पुन्हा महागले
1 min read
पुणे दि.९:- मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आता सीएनजी आणि पीएनजी म्हणजेच स्वयंपाकघरातील पाईप गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने आजपासून (ता. ९) सीएनजीच्या किमतीत प्रती किलो १.५ रुपये आणि पीएनजीच्या किमतीत प्रती युनिट १ रुपये वाढ केली आहे. आता सीएनजीची नवीन किंमत प्रति किलो ७९.५० रुपये झाली आहे. तर पाईप गॅसची किंमत प्रती युनिट ४९ रुपये झाली आहे.
घरगुती गॅसच्या किमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे एमजीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे की सीएनजी अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे.
फेब्रुवारीमध्येच ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा किमती वाढल्यामुळे प्रवाशांना जास्त खर्च करावा लागू शकतो.