राष्ट्रीय आर्थिकदष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिराचे घवघवीत यश
1 min read
बेल्हे दि.५:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून विद्यालयाची स्पर्धा परीक्षेतील दैदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.
आर्या रविंद्र बोरचटे (१११ गुण) व मोमीन माहीन नुरजमील (९७ गुण) या विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक झालेल्या असून त्यांना प्रतिवर्षी १२,००० रु. प्रमाणे पाच वर्ष शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणेः
आवारी वैभव पोपट, डुकरे करण लक्ष्मण, गुंजाळ संस्कार अशोक, गुंजाळ मेघराज लक्ष्मण, गाडगे चैतन्य प्रमोद, गाडगे समृद्धी कांचन, गुंजाळ समृद्धी दत्तात्रय, नायकोडी संचिता मंगेश, गुंजाळ संस्कृती दिनेश, गुंजाळ आराध्या संदीप, आरोटे किमया विशाल, गोरडे दिव्या दत्तात्रय, बोरचटे आर्या संदीप, तांबे स्वरा संतोष यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख गोपाल फंगाळ तसेच विषय शिक्षक नितीन मुळूक, स्मिता बांगर, विकास गोसावी, जयश्री फापाळे यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना प्राचार्य राजेंद्र पडवळ
तसेच उपमुख्याध्यापक प्रविण राशीनकर व पर्यवेक्षक दत्तात्रय खोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.