पारगावच्या रवीना डुकरे ची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
1 min read
पारगाव दि.२:- मंगरूळ – पारगाव (ता.जुन्नर) येथील प्रसिद्ध गाडामालक वै. विठ्ठल डुकरे यांची नात रवीना बाळासाहेब डुकरे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने गावाच्या वतीने तिची मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला.
रवीना डुकरे हिने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं असून गावातून मुलींमधून PSI होण्याचा पहिला मान मिळाला आहे. महात्मा गांधी विद्यालय पारगाव या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण
करून विद्याधाम शिरूर या ठिकाणी अकरावी बारावीचे शिक्षण घेतलं तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीचा वारसा असून शेतकरी कुटुंबातील फार कष्टाने आणि मेहनतीने पीएसआय पदी निवड झाली.
त्यानिमित्ताने पारगाव तर्फे या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयांमध्ये नुकताच संपूर्ण गावच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील गावचे शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी चव्हाण, देवराम तट्टू, गावचे उपसरपंच रामचंद्र डुकरे,
गोपाल कृष्ण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश चव्हाण तसेच सोसायटीचे चेअरमन प्रशांत तट्टू, बेल्हे येथील साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सचिव आणि मंगरूळ गावचे सामाजिक कार्यकर्ते निलेश लामखडे,विद्या धामचे प्राचार्य वसंत सुकाळे, जानकु डावखर,
पिंपरखेड गावचे डीवायएसपी दयानंद ढोमे त्याचप्रमाणे पारगाव गावच्या माध्यमिक शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ तसेच प्राथमिक शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते. या वेळी गावातील आठवी मध्ये शिकत असणाऱ्या वेदिका कैलास डुकरे व वेदांती येवले या दोन विद्यार्थिनी एनएमएमएस परीक्षेमध्ये
उत्तीर्ण होऊन त्यांना केंद्र शासनाची 60 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याने त्याही मुलींचा सत्कार करण्यात आला.