कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

1 min read

आणे दि.२:- आणे (ता. जुन्नर) येथील कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरती दत्तू सातकर (वय ३५ राहणार गाजदीपूर, तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर) या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दत्तू सातकर हे मंगळवार दि.१ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर नगरच्या दिशेने चालले होते.

त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच १६ डीइ ५६२६ या दुचाकीला पेमदरा येथील भैरवनाथ मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर स्वरूपाची इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन धारकावरती आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या आत्तेभाऊ आप्पासाहेब (रा. ढोकी, ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

अपघात स्थळी सुनील दाते व ग्रामस्थांनी तात्काळ मदत केली. मयत दत्तू सातकर हे मेंढपाळ असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे