अनुजा खिलारी चे एम.बी.बी.एस. परीक्षेत यश
1 min read
शिरोली दि.२:- शिरोली गावचे अनिल मोतीलाल खिल्लारी यांची कन्या अनुजा अनिल खिलारी हीने एम.बी.बी.एस. परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सविता गोविंद गुंजाळ व स्काऊट/ गाईड राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक/ माजी मुख्याध्यापक गोविंद गुंजाळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता सहावी आणि नववीच्या स्पर्धेत तिने मेडल प्राप्त केले होतं. होमी भाभा विज्ञान केंद्र मानखुर्द इथे बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या निवासी कार्यशाळेत तज्ञ शास्त्रज्ञांना निमंत्रित केले जाते.
व या विद्यार्थ्यांना सायन्स ऑलिंपियाड गणित ऑलिंपियाड, जिओग्राफी ओॅलिंपियाड, एस्ट्रॉनॉमी आकाश निरीक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. सदर निवासी शिबिरास कुमारी अनुजा उपस्थित होती. त्यावेळेस गोविंद गुंजाळ बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होतो.
अनुजाला तिच्या कठोर परिश्रमाचेयश प्राप्त झालेले आहे. घरामध्ये अध्ययना पोषक असं वातावरण ठेवल्याबद्दल त्यांचे मातापित्यांचे, आजोबा आजीचे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.