श्रीराम विद्यालयाचा मयुरेशला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट् आणि गाईड्स राज्य पुरस्कार परीक्षेत यश

1 min read

आंबेगाव दि.१:- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये भोर येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स मार्फत घेण्यात आलेल्या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत श्रीराम विद्यालयातील मयुरेश वनराज ढवळे, हा इयत्ता आठवीतील विद्यार्थी यशस्वी ठरला.महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्व कौशल्ये, आणि विविध सामाजिक कार्यांचा अनुभव मिळतो. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि त्यांना भविष्यकाळातील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मयुरेशला सुमती राजगुरू व अर्चना आचार्य या स्काऊट गाईड शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य फापाळे डी.पी. सर्व सेवक वर्ग, शाळा समिती सदस्य व ग्रामस्थांनी मयुरेश चे अभिनंदन अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे