राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान

1 min read

मुंबई दि.२९:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय रु. ५० अनुदान योजनेंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च असे ३ महिन्याचे २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले. ऑनलाईन अनुदान वितरणप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष मुंदडा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे