सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद संपन्न
1 min read
राजुरी दि.२९:- जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील महारिया चारीटेबल ट्रस्टचे सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंगीनियारिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद “अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन” या विषयावर राष्ट्रीय परिषद दोन सत्रा मध्ये संपन्न झाली. या परिषदेसाठी प्रमुख रिसोर्स पर्सन म्हणून जी एम आर टी मधील सीनियर इंजिनियर हनुमंतराव भंडारी, संचालक R2E टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचे डॉ. अजित कुमार यादव यांनी प्रमुख उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमात चेअरपर्सन म्हणून सहभागी झालेले हनुमंतराव भंडारी म्हणाले की, तांत्रिक बैठकींमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे संवाद कौशल्य सुधारण्यासोबतच अधिक ज्ञान मिळवता येईल, असे ते म्हणाले.या राष्ट्रीय परिषदेमध्ये ७२ रिसर्च पेपर आले व त्यांचे सादरीकरण करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजीनियरिंग कम्प्युटर इंजीनियरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग इत्यादी शाखांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
तत्पूर्वी या कॉन्फरन्सचे उद्घाटन महाविद्यालयाचे खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते झाले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी बालारामडू यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ .मनोज कुमार यांनी केले.
तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना वाघ यांनी केले तर आभार साक्षी भुजबळ यांनी मानले. ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले.