दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा क्षेत्र भेट व अभ्यास दौरा
1 min read
बेल्हे दि.१६:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कला शाखा अर्थशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील 20 विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी द्वारे येवले मसाले आणि ऐश्वर्या गोट फार्म यांना भेट देऊन पाहणी व अभ्यास केला.
जुन्नर तालुक्यातील पारगावचे प्रसिद्ध मसाले उत्पादक अरविंद येवले यांच्या येवले मसाले या उद्योगाला भेट देण्यात आली. या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, वापरण्यात येणाऱ्या मशनरी, उत्पादन, उत्पादनाचा दर्जा, तसेच उपलब्ध बाजारपेठ, वाजवी किंमत, गुंतवणूक या सर्व बाबींची माहिती येवले दाम्पत्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मानही केला.
तसेच विद्यार्थ्यांनी देवगाव ता.आंबेगाव येथील ऐश्वर्या गोट फार्म या गावडे कुटुंबियांच्या गोट फार्म ला भेट दिली गेली. 16 वर्षे गावडे कुटुंबीय हे गोट फार्म चालवीत असून त्यांच्याकडे 300 शेळी, बकऱ्या उपलब्ध आहेत. सोजल जातीच्या शेळी, बोकड आणि मडगूल जातीचे बकऱ्या त्यांनी पाळलेल्या आहेत.
साधारणपणे 90 ते 100 किलो वजन असणारे बोकड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सर्व गोट फार्म बाबत ची माहिती गावडे कुटुंबियांनी दिली. चारा व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, औषधोपचार,मार्केटिंग,गुंतवणूक, खरेदी व्यवस्था, विक्री व्यवस्था,
बाजारपेठ याबाबत माहिती देताना राजस्थान मधून खरेदी करून छोट्या बकऱ्यांना वाढवून तीन ते पाच महिन्यांमध्ये दुप्पट नफा मिळवण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. भविष्यात कोणाला जर गोट फार्म करायचा असेल तर आपण नक्कीच मार्गदर्शन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या गोट फार्म ला दिलेल्या भेटीबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या या क्षेत्रभेट अभ्यास सहलीसाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार आणि सचिव परेश घोडे यांनी अर्थशास्त्र विभागातील सहभागी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.