पीएम किसानची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब

1 min read

अहिल्यानगर १३:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. शेतकऱ्यांनी वरील संदेशाची लिंक उघडू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे