आज जागतिक महिला दिन

1 min read

जुन्नर दि.८:- आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन, म्हणजे नारीशक्तीचा दिवस. आजच्या दिवशी जगभर महिलांचा सन्मान केला जातो, त्यांच्या धैर्याची आणि कर्तृत्वाची गाथा गायली जाते.महिला म्हणजे शक्ती, महिला म्हणजे प्रेरणा. प्रत्येक क्षेत्रात आज महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. घर असो वा ऑफिस, शिक्षण असो वा विज्ञान, क्रीडा असो वा राजकारण, जिथे बघावे तिथे महिलांची दमदार कामगिरी. आजचा दिवस खास आहे, कारण हा दिवस आहे, त्या प्रत्येक स्त्रीसाठी जिने आपल्या आयुष्यात अनेक भूमिका लीलया पार पाडल्या आहेत. आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण अशा अनेक नात्यांनी आपले जीवन सुंदर बनवणाऱ्या प्रत्येक महिलेला आज सलाम…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे