जुन्नर तालुक्यात मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरणाची बेल्हे येथून सुरुवात

1 min read

बेल्हे दि.६:- सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जुन्नर तालुक्यात वैद्यकीय विभागामार्फत जापानिक मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये १ ते १५ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्याची सुरुवात गुरुवार दि.६ रोजी झाली. या अंतर्गत बेल्हे येथे ५०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.जापनीज मेंदूज्वर हा एक गंभीर आजार असून, ताप, सतत उलट्या होणे अशी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या आजारावरील लसीकरण हा एकमात्र सुरक्षित पर्याय आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य वैद्यकीय डॉ.शिवाजी फड यावेळी म्हणाले. या वेळी बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, सामाजिक कार्यकर्ते जानकु डावखर, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के. पी. सिंह,शिक्षक तसेचबेल्हे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अब्दुल शेख, आरोग्य सहाय्यक राजेंद्र पवार, आरोग्य सेवक निलेश झिम्मे, आरोग्य सेविका मंगल खराडे, स्मिता मुंडे, सुजाता गायकवाड, आशा सेविका तसेच बेल्हे व निमगाव सावा येथील आरोग्य परिचारिका यांनी लसीकरण केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे