शिंदेवाडीच्या सरपंचपदी लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड

1 min read

आणे दि.४:- शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावच्या सरपंच पदी लक्ष्मण यमाजी शिंदे यांची बिनविरोध एकमताने निवड झाली. अजित शिंदे यांनी स्वखुशीने सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागी सोमवार दि.३ रोजी बिनविरोध निवड झाली.

या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाकडून मंडळ अधिकारी दीपक मडके, आणे तलाठी हेमंत भागवत, शिंदेवाडी तलाठी श्याम सलामे, श्रद्धा बेलकर, ग्रामसेवक गुलाब जगताप यांच्या देखरेखी खाली निवडणूक पार पडली.

सर्व समस्थ ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने माजी सरपंच एम.डी.पाटील, माजी सरपंच अजित शिंदे, उपसरपंच सुभद्रा शिंदे, गोरक्षभाऊ शिंदे, दादा कडूस्कर यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बहुसंख्येने शिंदेवाडी ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकारी देवस्थान माजी अध्यक्ष दगडू पाटील शिंदे, माजी सरपंच सीताराम शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, खजिनदार दादाभाऊ शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष खंडूशेठ बेलकर, पोलीस पाटील उषा शिंदे, लहू मुळे, विलास मुळे, सुखदेव व बाळासाहेब निकम, ह भ प. ठकाजी महाराज, बाळासाहेब शिंदे, मुरलीधर शिंदे, जालिंदर नवले, संपत शिंदे, रामदास शिंदे, सुरेश औटी, भागवत शिंदे,कोंडीभाऊ शिंदे, धोंडिभाऊ शिंदे, विठ्ठल व विलास यमजी शिंदे, शरद शिंदे, सुरेश शिंदे, संजय शिंदे, पोपट शिंदे, अशोक शिंदे, रमेश शिंदे, संतोष शिंदे, जितेंद्र आहेर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे