गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने रोज अपघात
1 min read
आणे दि.३:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा ते पेमदरा येथे कल्याण नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी गतिरोधक टाकले आहेत
परंतु हे डांबरी गतिरोधकाला पांढरे पट्टे न मारल्याने व गतिरोधक दर्शक फलक न लावल्याने या ठिकाणी रात्री मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या गतिरोधकामुळे अपघात कमी होणे ऐवजी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच सूचनाफलक लावलेला नसल्याने वारंवार अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच आळे, बेल्हे, गुळुंचवाडी, आणे, पेमदरा येथे दररोज अपघात होत आहेत.
त्यामुळे रस्त्यावरती सूचनाफलक व गतिरोधकावरती पांढरे पट्टे मारण्याची मागणी आणे सरपंच प्रियांका दाते, पेमदरा सरपंच जयश्री गाडेकर, नळवणे सरपंच अर्चना उबाळे आणे उपसरपंच सुहास आहेर, उपसरपंच बाळासाहेब दाते, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, सुनील दाते, संतोष आहेर, माऊली संभेराव, पाटील गाडेकर यांनी केली आहे.
प्रतिक्रिया:- ‘पुढील चार पाच दिवसांत या ठिकाणच्या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात येतील.’
अनिल गोरड, टेक्निकल मॅनेजर, कल्याण अहिल्यानगर नॅशनल हायवे
——