कौतुकास्पद! जुन्नर च्या श्रद्धेय गाडेकर ने बनवले भारतातील पहिले ऑफलाईन नेवीगेशन ट्रेकिंग ॲप

1 min read

जुन्नर दि.२८:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील श्रद्धेय सुनील गाडेकर (वय २२) याने आपल्या दोन इंजिनिअरिंग करणाऱ्या मित्रांच्या मदतीने दुर्ग हे भारतातील पहिले भारतीय ऑफलाईन नेवीगेशन ट्रेकिंग ॲप जे गड किल्ले चढण्यासाठी मार्ग अणि वाटा दाखवते हे ॲप तयार केले आहे. सध्या सह्याद्रीत ट्रेकिंग करताना अपघातांची संख्या वाढत आहे, विशेषतः हरवणे आणि वाट चुकण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत दुर्ग ॲप ट्रेकर्ससाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. भारतातील पहिल्या आणि एकमेव ऑफलाइन ट्रेकिंग नॅव्हिगेशन ॲपमधून १६० हून अधिक गड-किल्ल्यांचे, धबधब्यांचे आणि गुहांचे नकाशे उपलब्ध आहेत. इंटरनेटशिवायही हे ॲप अचूक मार्गदर्शन करते. त्यामुळे हरवण्याचा धोका कमी होतो. ट्रेकिंगला सुरक्षित आणि सुकर बनवण्यासाठी दुर्ग ॲप सध्या काळाची गरज बनले आहे. श्रद्धेय गाडेकर हा सध्या बीएससी ऍग्री करत असून लहानपणापासून त्याला गड किल्ले सर करण्याची व ट्रेकिंग करण्याची आवड आहे. ट्रेकिंग करताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्याने ट्रेकर्सला मदत होणारे ॲप हे करण्याचे ठरवले. इयत्ता बारावी पासून तो हे ॲप बनवण्याचे प्रयत्न करत होता. त्याने प्रमोद पुड़ाले, सागर यादव या आपल्या दोन इंजिनियरिंग करत असणाऱ्या मित्रांची यासाठी मोठी मदत झाली.

या तिघांनी तीन वर्षाच्या अथक प्रयत्नांनी हे यश मिळवले. श्रद्धेय गाडेकर च्या या यशाचे जुन्नर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

या दुर्ग ॲप वैशिष्ट्ये:
1. 150+ ट्रेक रूट्स:महाराष्ट्रातील 150 पेक्षा जास्त किल्ले, धबधबे आणि गुहांचे नेव्हिगेशन. 2. ऑफलाइन नेव्हिगेशन: ट्रेक सुरू करण्याआधी नेव्हिगेशन मॅप डाउनलोड करून तुम्ही इंटरनेटशिवाय ट्रेक करू शकता.

3. सोपे व नेमके मार्गदर्शन:ॲपच्या नेव्हिगेशन फीचर्समुळे तुम्हाला सुरुवातीच्या ठिकाणापासून ट्रेकच्या टोकापर्यंत सहज पोहोचता येते.4. विश्वासार्ह आणि अचूक:ट्रेकिंगसाठी खास तयार करण्यात आलेले नेव्हिगेशन तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचवते.5. उत्तम रेटिंग आणि लोकप्रियता:
Google Play Store वर 4 स्टार रेटिंगसह ॲपचे 20,000+ डाउनलोड्स आहेत.

किल्ले प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उपयोग:
• ट्रेकिंगच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन. • सह्याद्रीच्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा नेव्हिगेशन मदत उपलब्ध. • ट्रेकिंगच्या उत्साहींसाठी एकमेव संपूर्ण ट्रेकिंग सोल्यूशन. DURG ॲपला महाराष्ट्राच्या दुर्गांची ओळख आणि ट्रेकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित करण्यात आले असल्याने सर्व ट्रेकर्सला याचा फायदा होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे