जुन्नर चे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

1 min read

जुन्नर दि.२७:- नारायणगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत – शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता आयोजित शिवसेना मेळाव्यात विविध पक्षातील नेते,

पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करणार असून त्यामध्ये शिवसेना – उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी – झालेले माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना उबाठा पक्षाचे तालुका संघटक व नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्यासह शिरूर

लोकसभा मतदार संघातील ४०० हून अधिक विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह अपक्ष आमदार शरद सोनवणे पक्ष प्रवेश करणार आहेत. अशी माहिती जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या वेळी उपसरपंच योगेश बाबू पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आरिफ आतार, विकास तोडकरी, अजित वाजगे, गणेश पाटे, अॅड. राजेंद्र कोल्हे, हेमंत कोल्हे, संतोष दांगट, भाऊ मुळे, नंदू अडसरे, अक्षय वाव्हळ, – संदीप गांधी, अजित कोऱ्हाळे आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्नर येथे येणार असून तेथून जुन्नरजवळील गोद्रे येथे होत असलेल्या जगातील सर्वांत मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणी कामाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर चाळकवाडी येथील आमदार सोनवणे यांच्या राजगड येथे कार्यालयाला भेट देऊन नारायणगाव येथे होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.

आमदार सोनवणे म्हणाले, राज्यात युती असली तरीही पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविणार आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी नारायणगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. श्री विघ्नहर कारखान्याने कारखान्याची निवडणूक होत आहे. माघारीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सत्यशील शेरकर यांनी पॅनल जाहीर केले असले

तरीही शेतकरी संघटनेबरोबर चर्चा करून काही जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच संचालक पदासाठी काही बदल करावा. त्यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे