बेल्ह्यात महादेवाची सात मंदिरे; महाशिवरात्री निमित्त दिवसभर गर्दी

1 min read

बेल्हे दि.२७:- दरवर्षी प्रमाने याही वर्षी महाशिवरात्र बेल्हे या ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. बेल्हे गावात महादेवाची सात मंदिर आहेत. यासर्व ठिकानी महाशिवरात्री मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. बेल्हे गावठानातील श्री नागेश्वर महादेव मंदिरात ही महाशिवरात्री निमित्त पहाटे चार वाजता बेल्हे वि.का.सोसायटिचे व्यवस्थापक बाळासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते महापुजा करन्यात आली. मंदिराला व नागेश्वर महादेवाच्या पिंडीला आकर्षक हार फुलांची सजावट करन्यात आली होती. सकाळी सात वाजल्या पासुन भाविक भक्तांना साबुदाणा चिवडा वेफर्स व केळिचे दिवसभर वाटप करन्यात आले. या कामी शिवाजी डुंबरे, संतोष शिंदे, किरन व अक्षय शिवले प्रथम बांगर व नागेश्वर भक्त मंडळानी सहकार्य केले दिवसभर महादेवाच्या भक्त मंडळिंनी परिसर फुलून गेला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे