आई व चुलतीच्या स्मरणार्थ शालेय वस्तूंचं वाटप; मुख्याध्यापकांचा स्तुत्य उपक्रम:- रामभाऊ सातपुते

1 min read

शिरोली दि.२७:- ज्यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे (सुलतानपूर – बोरी ) या विद्यालयाचा अल्पावधीतच चेहरा- मोहरा बदलत आहे, ते राज्याचे इंग्रजी भाषा तज्ज्ञ मार्गदर्शक, व्याख्याते, निवेदक, साहित्यिक, अष्टपैलू मुख्याध्यापक म्हणून नावलौकिक असलेले, महेंद्र मल्हारी बोऱ्हाडे यांचा राज्य पुरस्कार प्राप्त रामभाऊ सातपुते, गुणवंत शिक्षक शिवराम गुंजाळ, उपसरपंच दत्तात्रय डावखर, शाळा व्यवस्थापन चे माजी अध्यक्ष राजू पोळ व सर्व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी माऊली महाराज खिलारी (तंटामुक्ती अध्यक्ष ) कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दिवेकर, गुणवंत शिक्षिका राधा गुंजाळ, मुख्याध्यापिका सुनंदा ढगे, रोहिणी गिलबिले, सुभाष खिलारी बाळासाहेब चौधरी, योगेश शेळके, अमन मणियार, अल्ताफ मनियार 1996/ 97 चे सर्व माजी विद्यार्थी- रखमा खिलारी, भानुदास खिलारी, संतोष खिलारी, संतोष डावखर, मच्छिंद्र खिलारी, भरत खिलारी, हेमचंद्र डावखर, NSG News चे निलेश गाडगे व सुनील गहिणे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आई कै. शांताबाई मल्हारी बोऱ्हाडे, व चुलती ( काकी ) कै. इंदुबाई अंबादास बोऱ्हाडे. यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोऱ्हाडे कुटुंबीयांनी एक लाख तीस हजार रुपयांची ठेव बँकेत ठेवली असून ते येणाऱ्या व्याजाच्या रकमेमधून निराधार, गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत ज्या ठिकाणी गरज आहे तेथे दिली जाणार आहे. दानधर्माची सुरुवात ही घरापासून होत असते. त्याची अनुभूती इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे सुलतानपूर बोरी या विद्यालयात सर्व ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे व त्यांच्या बंधू-भगिनी व सर्व बोऱ्हाडे कुटुंबीयांकडून तीस हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्यांचे वाटप नुकतेच विद्यालयात करण्यात आले. इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपास बॉक्स, विद्यालयातील सर्व गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शंभर व दोनशे पेजेस वह्या, संस्थेची पूर्व परवानगी मिळाल्यानंतरच आठवी व नववीतील सर्व विद्यार्थिनींसाठी जॅकेट (कोट), तसेच विद्यालयातील साडेचार किलोमीटर, व सव्वा पाच किलोमीटर वरून येणाऱ्या दोन गरजू मुलींसाठी दोन सायकल्स, तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी., यासाठी मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांनी आपले मार्गदर्शक शिक्षक (गुरुवर्य) कै.सुरेश दादाभाऊ शेळके सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता दहावी मधील फक्त इंग्रजी विषयामध्येच सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पाच हजार रुपयांच्या ठेवीच्या रकमेतून येणाऱ्या व्याजातून बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.विशेष म्हणजे ह्या बोऱ्हाडे कुटुंबीयांनी तेजेवाडीच्या जडनघडणीपासून ते गावच्या उभारणीपर्यंत सक्रिय सहभाग घेतला आहे. कै. लक्ष्मण गोपाळा बोऱ्हाडे, कै. हौसाबाई लक्ष्मण बोऱ्हाडे या आजी व आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ महादेवाचा सभामंडप बांधून लोकार्पण करण्यात आलेला आहे. चुलते कै.अंबादास लक्ष्मण बोऱ्हाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अत्याधुनिक स्नानगृह, बांधून लोकार्पण करण्यात आलेल आहे. नवीन सभा मंडप, प्राथमिक शाळा तेजेवाडी ह्या सर्व कामांसाठी सोळा लाख रुपयांचे आर्थिक साह्य देऊन खूप मोठे योगदान केलेले आहे. कुटुंबाचा तोच आदर्श मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे सरांनी घेऊन ज्या-ज्या शाखेमध्ये काम केले. त्यामध्ये शिरोली बुद्रुक, ओझर, उंब्रज, बोरी बुद्रुक सर्व शाखेमध्ये दहा हजार रुपयांची ठेव ठेवून येणाऱ्या व्याजांमधून विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जात आहेत. मुख्याध्यापक बोऱ्हाडे सरांनी विद्यालयामध्ये आत्तापर्यंत लोकवर्गणीतून वॉटर फिल्टर, शाळेच्या नवीन पाट्या, सर्व विद्यार्थ्यांसाठी दप्तरे, विद्यार्थ्याच्या काकांसाठी तीन चाकी सायकल, 150 नवीन वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, कचराकुंड्यांचे स्थलांतर, पाण्याचे जार, रेन हार्वेस्टिंग योजना ही सर्व कामे लोकवर्गणीतून पूर्णत्वास नेलेली आहेत. स्वच्छता ग्रहे व संरक्षण भिंतीचे बांधकामाचे कामकाज ही संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. अत्यंत कल्पक, धडाडीचे व कार्यक्षम मुख्याध्यापकांमुळे विद्यालयाची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी, पालक व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सदस्य मुख्याध्यापक बोऱ्हाडे सरांचे अभिनंदन करत आहे. मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये राबवलेली उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या शैक्षणिक साहित्याची भेट हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून तो इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन साठी पात्र आहात असे उद्गार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र घाडगे साहेब यांनी काढले. त्याबद्दल महेंद्र बोऱ्हाडे सरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे