मंगरूळ येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा
1 min read
मंगरूळ दि.२६:- श्री हनुमान मंदिर मंगरुळ जिर्णोद्धार निमित्ताने वै. कोंडाजीबाबा डेरे वै. रावजी बाबा जाधव यांच्या प्रेरणेने व हभप छोटे माऊली कदम आळंदी याच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम सप्ताह व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दि. 26 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सांय 6.30 वा ते 8.30 वा. महाराष्टातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन व रात्री महाप्रसाद व संगीत भजन, दि. 4/3/2025 रोजी सकाळी 9.30 वा. मुर्तीची भव्य मिरवणूक, व महाप्रसाद दि. 6/3/2025 रोजी सकाळी 9.30 वा. मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुभहस्ते जगद्गुरू शंकराचार्य स्वामी नरसिंह स्वामी सरस्वती करवीर पीठ कोल्हापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
10.30 वा. ते दुपारी 12.30 वा.हभप तुळशीराम सरकटे यांचे किर्तन व महाप्रसाद, दि. 7 मार्च रोजी सकाळी 9.30 वा. हभप छोटे माऊली कदम आळंदी याचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद तरी सर्व भाविकांनी कार्यक्रम सहभागी व्हावे असे आव्हान समस्त ग्रामस्थ मंडळी मंगरुळ यांनी केले आहे.