शिरोलीतर्फे आळे शाळेला सात लाखांची देणगी
1 min read
शिरोली बोरी दि.२६:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिरोली बोरी न्यू इंग्लिश स्कूल व गावातील अंगणवाडी, बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन पार पडले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी शरद लेंडे, पांडुरंग पवार,शिरोली गावच्या सरपंच प्रिया खिलारी, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश खिल्लारी, सुदाम डावखर, वैभवशेठ काळे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, केंद्रप्रमुख अशोक हांडे, खंडेराव ढोबळे, रमाकांत कवडे, रवींद्र वाजगे, अंबादास वामन, जयसिंग गुंजाळ, राजु पोळ, निलेश मुळे, रखमा खिलारी, सुभाष खिलारी , अजित खिलारी, रामभाऊ सातपुते, आदर्श शिक्षक शिवराम गुंजाळ सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंगणवाडीपासून नववीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनीनृत्याविष्कार, समूहनृत्य, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, देवीचे गाणे, विनोदी गीते, पथनाट्य विविध रिमिक्स गाणी, लोकगीत याबरोबर विद्यार्थ्यांनी सुंदर कलाविष्कार सादर केले.
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक या कार्यक्रमात जवळपास १६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.दरम्यान, यावेळी शाळेच्या संगणक कक्ष व लायब्ररीसाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ गावातील उद्योजक यांनी सात लाख रुपयांहून अधिक देणगी जमा केली.
या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका सुनंदा ढगे, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे, सुमन चिखले, रोहिणी गिलबिले, उषा भारती, वाय एस शेळके, संगीता जाधव, उषा साळवे, स्वप्नाली आगळे, निवृत्ती डावखर, अरुण खिलारी, तुषार डावखर, सचिन सातपुते,
रखमा खिलारी, तुकाराम डावखर, ज्ञानदेव खिलारी यांनी केले.या सर्व गाण्यांची कोरोग्राफी विशाल गोकुळ सोनवणे, प्रतीक मनीष गोफणे, नितीन विजय केदार, अनिकेत रामदास रोकडे, शुभम प्रकाश गाडगे या सर्वांच्या अत्यंत मेहनतीने कार्यक्रम सुंदर झाला. व सर्व विद्यार्थ्यांचे मेकअप प्रिया सोनवणे, साक्षी किरण खंडागळे यांनी केले.
साऊंड सिस्टिम, लाईट व स्टेज व्यवस्था अंबिका स्पिकरचे मालक विठ्ठल नारायण डुकरे यांचे सहकारी लाभले.एकनाथ तट्टू यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवेदिका तेजल बोरचटे व पांडुरंग जाधव यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्वाच मान्यवराकडुन पत्रकार निलेश गाडगे व पत्रकार सुनिल गहिने सोमनाथ गाडगे यांचा सन्मान करण्यात आला.