विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

1 min read

बोटा दि.२६:- संगमनेर तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

“विद्या दर्पण 2K25” या विशेष संमेलनाचा तसेच शिवजयंती उत्सवाचा भव्य आयोजन 21 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे सेक्रेटरी रामदास पोखरकर सर, सीईओ डॉ. पाटील मॅडम, सुनीता कडप्पा, डॉ. प्रशांत फटांगरे, दिपक रहाणे, प्राचार्य डॉ. सुदर्शन बोरकर आणि प्राचार्य डॉ. किरण शिंदे उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांनी प्रास्ताविक करत. महाविद्यालयाच्या वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचा आढावा सादर केला.विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच, शैक्षणिक आणि अतिरिक्त उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपाली कुरकुटे यांनी केले, तर प्रा. योगेश तांबडे यांनी आभार प्रदर्शन करून समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे