सरकारचा मोठा निर्णय! CBSE दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार
1 min read
दिल्ली दि.२६:- विद्यार्थ्यांसह पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आता दहावी CBSE बोर्ड परीक्षेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 2025-26 मध्ये CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. तसेच ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. यासंदर्भात CBSE नं या प्रस्तावावर 9 मार्चपर्यंत लोकांकडून सूचना मागितल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 अंतर्गत बोर्डाच्या परीक्षेत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी दिली जाणार आहे. अर्थात प्रयोग परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन हे फक्त एकदाच केले जाणार आहे.
याशिवाय या दोनही परीक्षांसाठी एकच केंद्र निश्चित केले जाणार. त्याचबरोबर परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली जाणार आहे. नियमानुसार, बोर्डाची पहिली परीक्षा 2026 मध्ये 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान होईल. तर दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान होण्याची शक्यता आहे. सीबीएसईनं 2026 मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.