दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात “निर्भय कन्या अभियान”

1 min read

निमगाव सावा दि.२५:-समाज, आपल्या घरचे यांचा मुलीवर विश्वास असतो. यांस आपण पात्र असावे.मुलींनी संयम ठेवावा.महिलांचे सक्षमिक रण, लिंग गुणोत्तर, महिलांचे आरोग्य, महिलांचे शिक्षण, स्वरक्षण याकडे लक्ष देण आवश्यक आहे. महिला ह्या निर्भया होऊन त्यांनी अर्थार्जन सुद्धा केले पाहिजे. याबाबत डॉ. माणिक बोऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.

श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळ आयोजित “निर्भय कन्या अभियान” कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष कविता पवार होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. माणिक बोऱ्हाडे बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव, आणि नारायणगाव पोलीस स्टेशन च्या निर्भया पथकातील कॉन्स्टेबल सुवर्णा गडगे उपस्थित होत्या.कॉन्स्टेबल सुवर्णा गडगे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थींनी आपले आचार, विचार, वर्तुणूक, पोशाख कसा असावा, आपण शोशल मीडियाचा वापर कसा करावा, वेगवेगळे ऍप्स वापरताना काळजी घ्यावी. एक मुलगी म्हणून आपण आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरू नका. आपल्याला कोणी त्रास देत असेल, कोणी आपल्याशी गैरवर्तणूक करीत असेल. तर महाविद्यालयातील निर्भया पेटी मध्ये तक्रार टाका., आमच्याशी संपर्क करा. प्रा. नीलम गायकवाड, स्त्रीशक्ती महिला ग्राम विकास संघाच्या अफसाना कासम पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी डॉ. माणिक बोऱ्हाडे, कॉन्स्टेबल सुवर्णा गडगे, कविता पवार, अफसाना पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. प्रल्हाद शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी भोर यांनी केले. प्रा. ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविक आणि प्रा. पूनम पाटे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे