समर्थ संकुलामध्ये एक दिवसीय “उद्योजकता विकास” कार्यशाळेचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.२५:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता विकास” या विषयावर नुकतेच एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बेल्हे येथे करण्यात आले होते.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.या एकदिवसीय कार्यशाळेसाठी ‘गर्जे मराठी ग्लोबल’ या संस्थेचे फाउंडर प्रेसिडेंट आनंद गानू,प्रोमास इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संचालक बाळासाहेब गटकळ,पराशर कृषी व संस्कृती पर्यटन चे संचालक मनोज हाडवळे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आनंद गानू म्हणाले की,आपल्या आई-वडिलांना-गुरुजनांना आपला गर्व वाटेल असे नेहमी वागा.गर्जे मराठी ही संस्था दहा वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये स्थापन केली.भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं एकत्र करायची की,ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. अशा सर्व लोकांना बरोबर घेऊन ही संस्था आज मराठी लोकांसाठी कार्य करत आहे.या संस्थेच्या वतीने महामार्केटप्लसडॉटकॉम नावाची एक वेबसाईट तयार केलेली आहे.त्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या छोट्या-छोट्या कलाकुसर,प्रॉडक्ट तुम्ही जगभरात विकू शकता.ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यांना मार्गदर्शन केले जाते.यासाठी कुठल्याही प्रकारच्या चार्ज आकारला जात नाही.जिद्द,मेहनत आणि सातत्य त्याचबरोबर ध्येयासाठी जीव तोडून काम करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही यशस्वी होणारच.ध्येयाने आणि जिद्दीने पेटलेली माणसेच जीवनात यशस्वी होतात.तुम्ही सर्वांनी प्रोफेशनल नेटवर्कचा वापर करायला हवा.लिंकडीन आहे,गरजे मराठी सारखा ज्ञानकोश आहे,तिथे तुम्ही स्वतःला रजिस्टर करा.ध्येयाने भारावून जाऊन आपलं काम करा.स्टार्टअप इनोवेशन चा जमाना आहे.एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करणे.तसेच समस्येवर तोडगा काढण्यासाठी याआधी न केलेली गोष्ट करणे असे केले. तरच आपल्याला रिसर्च मध्ये वाव मिळू शकतो.सर्वांनी मिळून आपला देश आपले राष्ट्र मोठे होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतीक मुणगेकर, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.निलेश नागरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे