समर्थ च्या विद्यार्थ्यांना मिळणार परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी; शिनावात्रा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी थायलंड सोबत सामंजस्य करार
1 min read
बेल्हे दि.२६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व शिनावात्रा विद्यापीठ, थायलंड यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती रिसर्च,
इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर यांनी दिली.या सामंजस्य करारावर शिनावात्रा विद्यापीठातील प्रतिष्ठित प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली.
शिनोवात्रा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे व्हाईस प्रेसिडेंट असो.रथाबुरुत खुमसाब,फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सेस चे डेप्युटी डीन डॉ.वीणा चंतारासोमपोच, इन्स्टिट्यूट ऑफ मल्टीडिसिप्लिनरी पोस्टडॉक्टरल रिसर्च अँड फ्रँचायझी प्रोग्राम चे उपसंचालक डॉ.सिप्नारोंग कांचनवॉगपैसन यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी चे संचालक डॉ.प्रतिक्षा भंडारी,आंतरराष्ट्रीय घडामोडी च्या प्रमुख,संशोधन सहकारी समन्वय डॉ.डोरिस ओग्युरी,आंतरराष्ट्रीय घडामोडी च्या व्यवस्थापक सुश्री ज्युली मॅकरिओला,कॉन्फरन्स कोऑर्डिनेटर, कु.हार्ट महिने आदी मान्यवर उपस्थित होते.
या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण,संयुक्त संशोधन उपक्रम, विद्याशाखा सहयोग आणि जागतिक स्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी व सुविधा उपलब्ध करून देणे.त्याचबरोबर संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता व जागतिक स्तरावर दर्जेदार तांत्रिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे.
या सामंजस्य करारा अंतर्गत शिनावात्रा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांच्यामध्ये नावीन्यपूर्ण संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण त्याचबरोबर विद्यार्थी,प्राध्यापक आणि संशोधकांसाठी परिवर्तनाच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे शिनावात्रा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे उपाध्यक्ष प्रा.डॉ.असो.रथाबुरत खुमसाब यांनी सांगितले.
समर्थ शैक्षणिक संकुलाच्या रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलच्या वतीने करण्यात आलेल्या या शैक्षणिक सामंजस्य कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,
कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.