जुन्नर तालुक्यात दुसरी सोडत २८५ शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र मंजूर

1 min read

जुन्नर दि.२५:- जुन्नर तालुका पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने दुसऱ्या सोडतीमध्ये २८५ शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र मंजूर झाले आहेत. या यंत्रांची रक्कम प्रत्येकी १७ हजार ५३० रुपये प्रमाणे ‘डीबीटी’द्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.

सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी सुमारे ७०७ अर्ज जुन्नर पंचायत समिती कृषी विभागाकडे सादर केले होते. त्यातील पाहिली सोडतीत २३१ लाभार्थ्यांना काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पैसे वितरित करण्यात आले आहेत. त्या नंतर उर्वरित २८५ शेतकऱ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आलेली आहेत. २८५ पैकी १९० शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी २३१ व सध्या फेब्रुवारी अखेरपर्यंत २८५ अशा एकूण ५१६ शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी यंत्र मंजूर झाले. खरेदीची जीएसटी पावती व आरटीजीएसद्वारे पैसे विक्रेत्याला दिल्याची कागदपत्रे पंचायत समिती कृषी विभागात देणे अनिवार्य आहे. अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगितले आहे. तरी १९१ शेतकऱ्यांचा नंबर लागणे बाकी असून ते प्रतिक्षेत आहेत. अशी माहिती कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे