निरगुडेत महाशिवरात्री निमित्त किरणोत्सव
1 min read
जुन्नर दि.२५:- जुन्नर तालुक्यातील तीर्थक्षेत्र निरगुडे येथील हनुमान मंदिरातील शिवलिंगावर महाशिवरात्री पर्व काळात किरणोत्सव बुधवारी (दि.२६) सकाळी साडेसातनंतर होणार असून
हे पाहण्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री मारुती देवस्थान ट्रस्ट निरगुडेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
निरगुडे येथील इतिहास कालीन मारुती मंदिराच्या गाभार्यात शिवलिंग महारुद्र हनुमान, श्री गणेश या तीन मूर्ती असून या मूर्तीवर वर्षातून तीन वेगवेगळ्या कालावधीत सूर्यकिरणोस्तव पहावयास मिळतो. यावर्षीच्या महा शिवरात्री पर्व काळात बुधवारी सकाळी साडेसातनंतर नऊ
वाजेपर्यंत किरणोस्तव दर्शनाचा लाभ होणार आहे. त्यानंतर हनुमान जयंतीला मारुतीरायाच्या चरणाला सायंकाळी चार ते पाच किरणोत्सव होणार असून भाद्रपद महिण्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सातनंतर गणेश मूर्तीवर किरणोत्सव पाहिला मिळणार आहे. महाशिवरात्री निमित्ताने सकाळी सहा वाजता मांडव डहाळे, रुद्र अभिषेक साडेसातनंतर नऊ वाजेपर्यंत किरणोत्सव प्रसाद वाटप,
रात्री भजन, मध्यरात्री रुद्र अभिषेक हे धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार होणार आहेत. भाविकांनी किरणोत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभघ्यावा, असे आवाहन निरगुडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.